STORYMIRROR

Varsha Gaikwad

Tragedy Others

3  

Varsha Gaikwad

Tragedy Others

दांभिकता

दांभिकता

1 min
216

कितीदा नव्याने गळाभेट घ्यावी किती पेटवावी उराशी प्रभा 

दया याचनांचे भिकारी बनुनी किती वेळ तोलावयाची सभा 

मनाजोगते काय आहे कळेना मनाला कशाची हवी साधना 

उरी पेटतो दाह खोटेपणाचा पुरे आवरा सभ्य ढोंगीपणा 


रुजे अंश मातीत दांभिकतेचा नि दगडास केले दयाचे धनी 

कसे कोण जाणे सभोवार होते अशिक्षित ज्ञानी कुणाचे कुणी 

असे देवभोळे शहाणे मिळाले विधाने चुकीची किती माळली 

रडे देव आता खऱ्या भावनांचा तमाशा कराया फुले चालली 


गुणीवंत नाही दयावंत नाही इथे भावनी भव्य बाजार हा 

इथे रंक नाही न राजा कुठेही कुणी ना कुणाचे निराधार हा 

मनाजोगती वाट शोधावायला मनाने मनालाच ढकलायचे 

नवा जन्म घेऊन दाही दिशांना नव्या प्रेरणेनेच सजवायचे 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy