सारीपाट
सारीपाट
1 min
267
तोच क्षण, तीच वेळ, तोच दिवस, तोच खेळ "नियतीचा"
जीवनाच्या सारीपाटावरचे प्यादे, पात्रं मात्र वेगळे
सुख वेगळे, दुःख वेगळी आयुष्याची सूत्रं वेगळी
श्वास मात्र एकसारखेचं चालतात का सगळे?
जीवनरूपी वाळवंटात जीव तडफडतो
अतृप्त तो मानव कशासाठी तळमळतो
जातीत अडकलेल्या जीवांचा देव कोण?
प्रेमात पडले आहेत किती त्रिकोण
पडतात प्रश्न वरचेवर मला
देव आहे का विचारते स्वतःला
का घडतो जातीवरून हल्ला
का हसतो बुद्ध आणि मुल्ला
नको आहे हे प्रतिशोध
नीरव शांतता हवी
केवळ मानवता
हीच जात हवी
कृष्ण कांती मी
जिजीविषा
मुक्तता
शांती
मी
