STORYMIRROR

Yogita Takatrao

Inspirational Others

4.4  

Yogita Takatrao

Inspirational Others

मी व्हावी माझीच प्रेरणा

मी व्हावी माझीच प्रेरणा

1 min
823


रोजच नवा ध्यास घेऊन पाहते

प्रत्येक दिवस काही नवीन करते

नित्य नियमाने अवलंबली धारणा

रोजच मी व्हावी माझीच प्रेरणा


मीच बळ देते माझ्या पंखांना

भरारी देते उमलत्या स्वप्नांना

प्रयत्नांत नाही कुठेही कुचबंना

रोजच मी व्हावी माझीच प्रेरणा


अशक्य गोष्टी शक्यच करायच्या

नकारात्मक भावना लांब ठेवायच्या

रोजच वेचायच्या सुखद घटना

रोजच मी व्हावी माझीच प्रेरणा


मानलं मनापासुन तर आहे सुख

नाहीतर दिसत सुखात पण दुःख

करते प्रयत्न रमवणया माझ्या मना

रोजच मी व्हावी माझीच प्रेरणा


आलेच मरण अचानक समोर कधीही

ना व्हावी त्याची अवहेलना तेव्हाही

हसत मुखाने जाईन मी त्या दिवशीही

तेव्हा ही मी व्हावी माझीच प्रेरणा

तेव्हा ही मी व्हावी माझीच प्रेरणा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational