मी तुला जपणार आहे
मी तुला जपणार आहे
तु जगाच्या पाठीवर कुठेही रहा
मी तुला जपणार आहे..
तु तुझ्या दुनियेत फक्त खुश रहा
मी तुला जपणार आहे..
नातं आपल निखळ मैत्रीचं असणार आहे
मी तुला जपणार आहे..
गरज कधी पडू नये पण वाटलच तर राहणार आहे
मी तुला जपणार आहे..
जसा वारा श्वास जाणवत नाही पण नेहमी आहे
मी तुला जपणार आहे..
भेटणं बोलणं होईल न होईल पण मी नेहमी आहे
मी तुला जपणार आहे..

