STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract Romance

3  

Manisha Wandhare

Abstract Romance

मी तुझीच रे

मी तुझीच रे

1 min
186

धागे मनाचे झंकारले,

गुंतूनी गेले मला कुठे कळले,

पाहता तुला उकलताना,

मी तुझीच रे कळले ...

स्वर्ग भास सोबतीला तुझ्या,

तू नसता दिवस रखरखले,

काट्यावरही आनंद चालताना ,

मी तुझीच रे कळले ...

गर्दीत तुलाच मी शोधले,

नको मला कुणी सोबतीला ,

तू हवा तुलाच मी पाहिले,

मी तुझीच रे कळले ...

तुझ्या अवकाशात विस्तारले,


तुझ्या वाटेवर चांदणे टिपले,

साथ दे तू मला साताजन्माची,

मी तुझीच रे कळले...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract