मी स्वतःशीच झुंजत होते...
मी स्वतःशीच झुंजत होते...
मी स्वतःशीच झुंजत होते ,
अस्तित्व घेऊन हातात ,
सावलीला मागे लोटत होते ...
मी स्वतःशीच झुंजत होते ...
मुखवटे चढवुन चेहर्यावर,
नको तेवढे हसत होते,
घाव अंतरंगांतले ,
रंगवुन पाहत होते ...
मी स्वतःशीच झुंजत होते ...
पाऊला पाऊलावर तिथे,
सापडा होता रचलेला ,
धोक्यालाच विश्वास समजत होते ,
भास खरे मानत होते...
मी स्वतःशीच झुंजत होते ...
नदीसारखे वाहवत जाणे,
आता जरा कठीणच होते,
डबक्यालाच समुद्र समजून,
तळ त्याचा गाठत होते ...
मी स्वतःशीच झुंजत होते ...
