मी शिवाजीराजे भोसले
मी शिवाजीराजे भोसले
मी शिवाजीराजे भोसले रायगड आमच गाव, म्हणे इतिहास दगडावरती कोरलय आमचं नाव.
कोरलय आमचं नाव प्रत्येकाच्या जिभेवरी, म्हणे परत मी जन्मावे फिरूनी या भू वरी.
फिरूनी या भू वरी कधी थकला नाही प्रचार माझा जन्म व्हावा हा कित्येकांचा विचार
कित्येकांचा विचार जन्म व्हावा शेजारच्याच घरी , आपल्या घरी नकोच, अशी कामना अंतरी.
-center">
अशी कामना अंतरी निर्माण झाली जगती, मीच करावी या भू ची अपरंपार भक्ती? ??
अपरंपार भक्ती तुमच्या अंतरात असता, माझ्या जन्माची तुम्ही वाट उगा बघता.
वाट उगा बघता मी जन्मालो तुमच्यात, बेजबाबदारपणा सोडा घ्या अक्कल डोक्यात .
घ्या अक्कल डोक्यात , पहा राष्ट्र मागे गेले... तुमच्या मनातूनच बोलतोय मी शिवाजीराजे भोसले !!!