मी सैनिक देशाचा
मी सैनिक देशाचा


मी सैनिक भारतमातेचा
सुपूत्र माझ्या धरणीमातेचा
लाडोबा माझ्या आईबाबांचा
सजना माझ्या सजणीचा.....
मी रक्षण करतो भूमातेचे
लढतो मातेसाठी सीमेवरी
कुटुंबास मी त्यागतो पण
खूप खूप प्रेम करतो सर्वांवरी....
मन मला पण आहे ना
कुटुंबाला आधार देतो
संकटसमयी देशाचा पाईक होतो
देशाच्या रक्षणार्थ उभा ठाकतो.....
सीमेवरच आम्ही सैनिक सारे
सणाउत्सवाला आनंदानं नाचतो
घरच्यांची आठवण काढतो
व्हिडिओवर मग संवाद साधतो....
तन मन अर्पिले भूमातेसाठी
लढणार या भारतदेशासाठी
वेळ आलीच लढताना तर
प्राणाची आहुती देणार या देशासाठी.....