Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sujit Falke

Abstract Classics Inspirational

3  

Sujit Falke

Abstract Classics Inspirational

मी साधक

मी साधक

1 min
661


हृदयकमल तव चरणी ताई

अर्पण मी केले

रडक्या जिवाच्या दुखद वेदना

मज त्यातून दूर नेले

श्रवणीय वाणी तुमची सुखद

अनुभवत मी गेलो

मनाच्या विशाल नितळ सागरात

मी आज एक राजहंस झालो

यशाची ही गुरुकिल्ली घेऊनी

दाही दिशाचा खलाशी झालो

दुखे वेदनाचा प्रसव मोडुनी

बहुश्रुत आत्मविश्वासी बनलो

क्रिया करुन मनाच्या काही

अंकित मनाला उर्जावान करत गेलो

ब्रम्हांड तेजाची ओळख करण्या

एक एक अमृतकण वेचत गेलो

संपावी अगणित दुखे सर्वांची,

सुखे वाढावी अखंड अविरत

कृतज्ञतेचा झरा हृदयी पाझरुण

सर्वांना तृप्त शांत करत चाललो

जीवन जगण्याची कला सुंदर

हातोटीने आम्ही शिकत गेलो

आपल्या आशीर्वादीत करण्याने

मनपरिवर्तन आमचे करत गेलो

आजन्म ऋणात राहील आपल्या

सोबत अशीच असावी फक्त

नवीन शिखरे यशाची उंचच उंच

सहज पादाक्रांत करत गेलो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract