मी पाहिलेले कोकण...
मी पाहिलेले कोकण...
"येवा कोकण आपलाच असा"
ह्या ओळीच सांगे,त्याचा स्वभाव आहे कसा...
अगदी गोड, फणसाच्या गरा जसा,
निसर्गाने दिले आहे समृद्धीचे वरदान..
जिथे लाल माती पिके घेते छान,
नारळी,सुुुपारी डोले,उंच करून माना
त्याने खुलून दिसे निळा सागरी किनारा..
जेवणामध्ये मान असतो भाताचा...
फुुरका मारत पितात, पेला सोलकढीचा,
श्रीमंती तर दारो दारी मिळे बघाया...
कारण इथेे पिकतात हापूस,काजूच्या बागा,
"तुका माका" मायबोली चा वाटे हेवा...
त्या मध्ये जाणवे रान मेवा चा गोडवा,
घरे जरी बांधलेली चिरा कौलाची...
माणसाची मन आहेत सोन्याची,
येता गौरी गणपती,दसरा,शिमगा...
साजरा करताना उत्साह असे दांडगा,
कोकणकन्या रेल्वे ने जाता कोकणा,
डोळे सुखावतात ते सुुंदर दरी खोरे पाहताना,
असा कोकण आपला...
कोकणी माणसांनी आहे जपला.