STORYMIRROR

manasvi poyamkar

Abstract Others

5.0  

manasvi poyamkar

Abstract Others

मी नियम पाळत नाही

मी नियम पाळत नाही

1 min
14.4K


राजकारण्यांची उणीदुणी काढणारा मी

मतदानाचा हक्क मी बजावत नाही

रिझर्व्हेशन मिळत नाही म्हणून बोंब ठोकणारा

तिकिटांची रांगेतील शिस्त मी पाळत नाही

आरक्षण नाही म्हणून जातीच्या नावानं रडणारा

अन्यायाचे चाबूक सहन करू शकत नाही

रेल्वे उशिरा येते म्हणून रेलरोको करणारा

ट्रेन धावत पकडायची सवय मोडत नाही

धर्मनिरपेक्षतेच स्वप्न पहाणारा मी

प्रांतवादाचे व्हायरस डोक्यातून काढत नाही

धान्याचे भाव वाढले म्हणून ओरडतो

शेतात गाळत घाम नाही

सिग्नलवरच्या हवालदारांना शिव्या घालतो

ट्रॅफिकचे नियम फॉलो करत नाही

भारताला महासत्ता बनविण्याचं सप्न बघतो

आरक्षणाची हाव काही सोडत नाही


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract