पाऊस
पाऊस
आज खूप वर्षांनी पाऊस होता
तुझ्याही मनात अन् माझ्याही...
कुणाला रोमांच ओसंडणारा
तर कुणाचे अश्रू होणारा
आज खूप वर्षांनी पाऊस होता...
काळ बनून कोसळणारा
तर कुणाला घरापासून पोरके करणारा
आज खूप वर्षांनी पाऊस होता...
वाट पाहणाऱ्या साठी भगवान
काहिंच्यासाठी कर्दनकाळ
आज खूप वर्षांनी पाऊस होता....
तो तारणारा ही
मारणारा ही होता
आज खूप वर्षांनी पाऊस होता...
आज तो शब्द ही होता
अन् निशब्द ही
आज खूप वर्षांनी पाऊस होता....
आज तो कविता ही होता
आठवणी उमटून जाणारी
सरिता ही होता
आज खूप वर्षांनी पाऊस होता..
