STORYMIRROR

Shobha Wagle

Abstract Tragedy

3  

Shobha Wagle

Abstract Tragedy

माणुसकी

माणुसकी

1 min
187

माणूस माणसाला,चिडवून जात आहे

माणूसकी तयांची, नासून जात आहे


नात्यातला दुरावा,सगळा तसाच आहे

माया खरी मुलांची, आटून जात आहे


दैवास दोष नाही, जगण्यास खेळ माना

नातीच भावनांना, टाळून जात आहे


प्रेमात स्वार्थ आहे, पैशास मोल आहे

माणूसकी जगाची, हरवून जात आहे


सत्यास वाव नाही, खोट्यास ताव आहे

वकिलास भाव मोठा, ठरवून जात आहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract