माझे रूप...
माझे रूप...
हल्ली माझी चर्चा आहे खूप
खुशाल पडलेला आबडधोबड असे माझे रूप
श्रद्धाळूंची वर्दळ कमी नाही आज
न मागता लिंबू-मिरची मिळतो कापडाचा साज
रंगरंगोटी करून मला सजवतात रे खूप
खुशाल पडलेला आबडधोबड असे माझे रूप
भूल घालून थोतांड नवसापायी होतात रे लेकरं
वाजत गाजत जीव तो कापतात रे बकरं
पूजेचा तो थाट बघा नारळ अगरबत्ती वरनं मोठी धूप
खुशाल पडलेला आबडधोबड असे माझे रूप
