STORYMIRROR

BABAJI HULE

Abstract

3  

BABAJI HULE

Abstract

निरोप सरत्या कोरोना वर्षा २०२०

निरोप सरत्या कोरोना वर्षा २०२०

1 min
200

सरत्या कोरोना वर्षा, थांब जरासा,

निरोप घेतो तुझा अंतःकरणापासून थोडासा II

असा पळून नको जाऊ तू सोडून आम्हाला,

डोळे भरून पाहू देत मला तुझ्या शेवटच्या छटांना II 

या वर्षाचा कसलाही हिशोब नको मजला,

आठवणींच्या हिंदोळ्यावर पुढील आयुष्य निघेल मला II

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर उभे केलेस तू मला,

माणसा माणसातील खरे रूप समजावले म्हणून गळाभेट माझी तुला II

अश्रुनी भरलेल्या नयनांनी निरोप तुला देताना, 

शब्द माझ्या कंठातुनी फुटेना II

आशा, अपेक्षा संकल्प आणि स्वप्नांचे मात्र सूत जमेना,

याच वर्षाचा शेवट आणि सुरवात यातील फरक कळेना II

कोरोनाच्या प्रलयाने अवघी सृष्टी हादरली, 

बंद झाले व्यवहार आणि थांबल्या आर्थिक उलाढाली II

करोडो बाधित तर लाखोंचे मृत्यू पहिले मी जवळून, 

निसर्गाचे बदलेले रूप मात्र मी घेतले न्याहाळून II

फक्त जगण्याची आस होती मनी बाळगून,

कारण महिनो महिने केले होत तू सर्वाना लॉकडाऊन II

पणत्या, दिवे पेटवून टाळी आणि थाळीही वाजवली, 

परंतु गोरगरिबांची मात्र विटम्बनाचं झाली II

हातावर पोट भरणाऱ्यांना जीव द्यायची वेळ आली,

दानशूरांनी जनसेवाही केली परंतु स्वार्थ्यांनी पोळीही भाजून घेतली II

आपल्याच गणगोतांच मरणही विसरलो आम्ही,

प्लास्टिकमय मृत शरीराचे दर्शनही नाही घडवले तुम्ही II

सारे सुख दुःख स्मरणात राहिले माझ्या,

काय भेट देऊ तुला कायमचे लक्षात राहील तुझ्या II

आभार तुझे कसे मानावे हेच कळेना मला,

कोरोनाच्या महामारीतही जिवंत ठेवलेस तू मला II


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract