*माझी प्रतिज्ञा*
*माझी प्रतिज्ञा*
आज माझ्या अश्रुंच्या धारा पुन्हा वाहल्या
वाटलं की जावं आपण स्वर्गात राहायला
मग क्षणातच आई-बाबांचा विचार पडला
आणि भाऊ तिथेच नाही म्हणून ओरडला
आता जीवनाच्या माझा मला विचार पडला
हा असा प्रसंग जीवनात का बरं घडला
जीवनाची सर्वात मोठी शिकवण दिली त्याने मला
विचार करताच क्षणोक्षणी अश्रुंच्या धारा कोसळल्या
वास्तविक नाही तर माझ्या शब्दात तो घडला
माझ्या विचारांना यामुळे खूप जोर पडला
व्यक्तीत्वाच्या नांदात तो खूप दूर अडकला
बघा यामुळे माझ्या हातांनी वेग धरला
निघाली मी आज स्वप्नांना वास्तविक घडवायला
कुणी सोबत नाही म्हणून स्वतःचा हात स्वतः धरायला
रडवणारे खूप मिळाले म्हणून शोधते आज कुणी जीवनात हसवायला
पण मिळालेच नाही तर पुन्हा बसली रडायला
मिळेल काय कोणी हे अश्रू पुसायला
कळेल काय दुःख माझे पण कुणाला
शब्दांना लक्षात घेऊन निघाली मी आज एक प्रतिज्ञा करायला
हा शेवट आहे माझा
आजच्या नंतर नाही येऊ देणार मी जीवनात कुणाला
*"सन्मान द्या माझ्या या प्रतिज्ञाला.....!"*
