मी मुख्यमंत्री बोलतो
मी मुख्यमंत्री बोलतो
शपथ मी घेतली लोकहिताची आहे
पहिले कर्तव्य राज्याचा विकास आहे
गरीबी दारिद्रता बेरोजगारी दूर करुनी
नव्याने घडविणार माझे राज्य आहे
घरा घरांत जाऊन मी विकास करेन
घरकुल बांधून गरजूंना मिळवून देईन
कुटुंबातल्या एका व्यक्तीला सरकारी
उच्च शिक्षण नोकरी मी लावून देईन
उपलब्ध सार्या सुविधा जनतेला करी
उपाशी मरणार नाही राज्यात माझ्या
शेती नुकसान कर्जमाफी ही करेन मी
जीवा हानी टाळेन मी राज्यात माझ्या
उंच शिखरावर नेऊन दाखवेन माझे राज्य
मुख्यमंत्रीपदाचा दुरुपयोग घेणार नाही
संकट संकट येऊ देणार नाही राज्यावर
समाज नावावर राजकारण करणार नाही
खोटे आश्वासन जनतेची दिशाभूल नको
बोलेन तसा वागेन मी विश्वास जिंकीन तो
मानसन्मान जपणार हा माझ्या राज्याचा
सामान्य माणूस मी बनून मुख्यमंत्री बोलतो
