STORYMIRROR

Pandit Warade

Abstract Romance

2  

Pandit Warade

Abstract Romance

मी खरे बोललो

मी खरे बोललो

1 min
2.3K


मी खरे बोललो ते कडू लागले 

सोयरे हात मग आखडू लागले


आज माणुसकी हाय गेली कुठे

राक्षसी माणसे सापडू लागले


हाय नेते कसे मतलबी जाहले

साधण्या स्वार्थ ते धडपडू लागले


लाघवी हासली आज माझी सखी

हाय काळीज मग धडधडू लागले


एक छोटी परी लेक आली घरी

अंगणी बालपण बागडू लागले


ती मला पाहते, हासते , लाजते

तिचे लाजणे मज आवडू लागले


देव ना राहिले आज देवालयी

मंदिरे ओस आता पडू लागली


माणसा सारखा वाग तू " पंडिता"

माणसे माणसाशी लढू लागले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract