STORYMIRROR

Atharv Mahajan

Inspirational Others

4  

Atharv Mahajan

Inspirational Others

मी गातो गाथा भारती

मी गातो गाथा भारती

1 min
457

मी गातो गाथा भारती

ज्या भारत मातेचा मी ऋणी,

जिच्या अंगावरचे नवरत्ने ही

साद घाले स्वातंत्र्य संगीताची.


हिमवर्षाव पडतो जेथे

जिथे सुर्यकिरणे ही लाजते,

शिरोधारी हे निसर्ग मोती जणू

भारत मातेच्या शिरी मुकूट हिमाद्री सजवते.


मी गातो गाथा भारती

उत्तर भारता स्मरणी ठेऊनी,

ही साक्ष कुंभ भक्तीची सुवर्ण मंदिरी

याने रक्षिले भारता ढाल बनूनी.


जिथे प्रवाही सुवर्ण धारा गंगेच्या

उत्तर भारता हि संजीवनी,

सहस्ररूपी ही सुमनराणी

भारता हार घालती दवांत भिजूनी.


मी गातो गाथा भारती

जिचा निसर्ग वाटे कुबेर संपत्ती,

त्या सात बहिणींस नमन करतो

जपली ज्यांनी नाळ संस्कृतीची.


ईशान्यतेची महिमा गाता

भासे कर हात हा भारताचा,

हिचे निसर्गी सप्तरत्ने ऐसी

रंगवते हाती मेहंदी परंपरेची.


मी गातो गाथा भारती

ज्या सह्याद्रीचा छावा मी, 

ज्यांनी रक्षिले भारत मातेस माझ्या

त्या दोह घाटांच्या चरणी चित्रबिंदूत मी.


हा पूर्व पश्चिम घाट

जनु सह्याद्रीने नक्षिले,

मज भासतो हा पदराचा काठ

जिची ओटी भरली सागराने.


मी गातो गाथा भारती 

ज्या भारतमातेचा मी ऋणी,

जिच्या अंगावरचे नवरत्ने ही

साद घाले स्वातंत्र्य संगीताची.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational