मी एक चाहता तुझा
मी एक चाहता तुझा


अलिप्त होऊन नभापासून, पाहण्यास तुला मुकलेला
होता तो ही तुझा चाहता, एक तारा तुटलेला
अधीर होऊन गगनात सार्या, तुला पाहण्या फिरायचा
मिळवण्या एक कटाक्ष तुझा, रात्र सारी झुरायचा
प्रेम तुझे मिळविण्या स्वतःचे, सर्वकाही लुटलेला
आला तुझ्या भेटीस नभीचा, एक तारा तुटलेला
तुझ्यासह शतपावलीस त्याची, किरणे खाली यायची
चुंबून तुझ्या देहास सुगंधी, ती ही धन्य धन्य व्हायची
ना रुदन अंतरी तयाच्या, अन नव्हताच तो रुसलेला
मिटला त्याने श्वास होऊन, एक तारा तुटलेला
हृदयात तुझ्या नकळत तुझ्याही, घर त्याने केले
मेघदूत तिथे प्रेमाचे त्याच्या, महाल बांधून गेले
देहभान विसरून स्वतःचे, प्रेमात तुझ्या फसलेल्या
ओळख आहे तोच तुझा मी, एक तारा तुटलेला