STORYMIRROR

Latika Choudhary

Tragedy

3  

Latika Choudhary

Tragedy

परिघ

परिघ

1 min
13.2K


झंझावाती वादळातलं

आयुष्याचं वर्तुळ..

हतबल.. ..हताश....निर्वात....पोकळ..

वाट बघावी घासाची अन

अनुभवत परिपूर्ती दूरवरच्या सुखाची

कल्पनेतच .......!

आखल्या गेल्या सीमारेषा

निती-अनिती परंपरेच्या......

नावासाठी झगडत,मन-भावना गाडत

कर्तव्याची जाण सांभाळत

लक्ष्मणरेखा 'बाईपणाची'.......!

जाताच आले नाही परिघाबाहेर

धडपडत राहिली समांतरतेसाठी

पण........

ठाकल्या रेषा आडव्या उभ्या

तिला खुजे करण्यासाठी..

फक्त 'तो' च उंच.........?

तरीही सरसरत राहिली उर्मी

काटकोन......'त्रिकोण'....आयताकार

घेण्यासाठी......

पण गिधाडांचा थवा तोडण्यासाठी

लचके घालत असता झडप.....

करून घेतलं 'कासव' जीवाचं

अन 'वर्तुळाच्या' परिघातच मग

प्रकटली रेघ अन चितारले विश्व

आकारलेले.....भारलेले.... मंतरलेले......!

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy