STORYMIRROR

AnjalI Butley

Inspirational

4  

AnjalI Butley

Inspirational

'मी' ची लढाई

'मी' ची लढाई

1 min
322

'मी' ची लढाई


चालु असते सतत लढाई 'मी'ची 'मी' बरोबर...

कोण कळ लावतो लढाई करण्यास?


'मी' च ना?


कोण जिंकणार?

कोण हरणार?


''मी' च ना?


का व्यर्थ दवडतो वेळ 'मी'?


बुद्धीबळातल्या खेळातल्या सारखा

कधी 'प्यादा' तर कधी 'राजा'


मनातल्या या खेळाच्या लढाईत...


कधी बनतो 'मी' शेवटच्या क्षणी धारातीर्थ...

तर कधी अधे मधे धारातीर्थ...

तर कधी 'राजा'!


प्यादा असता मारला जातो अनेक वेळ...

खच पडतो माझ्या 'मी' चा 

माझ्या भोवती पर्वता एवढा!!!


परत सुरू करतो नव्याने खेळ...

'मी राजा' बनतो 'प्यादा' चा

लेवुन कनक तेज ...


मागे पडतो माझ्यातला 'मी प्यादा' 

आणि उजळुन निघतो 'मी राजा'



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational