मी भारतमाता बोलते
मी भारतमाता बोलते
मी भारत माता बोलते
जन्मले मायभूत सुपुत्र
मला स्वतंत्र करण्यासाठी
त्यांनीच घेतल हाती सूत्र
अभिमान मला त्या
देशप्रेमी शूरवीरांचा
भारत माझा देश आहे
पराक्रमी या बांधवांचा
घरदार त्यागुनी ज्यांनी
केला फक्त माझा विचार
मला सोडवले गुलामगिरीतून
केले भारताचे स्वप्न साकार
रंग, रूप, वेश, भाषा
असेल जरी वेगळे
सर्वजण नांदती आनंदाने
कुशीत माझ्या सगळे
