मी अशी मी तशी
मी अशी मी तशी
अशी मी तशी मी
म्हणा तुम्ही काही
फरक माझ्यात
कधी होत नाही
वाटते जनांना
आहे थोडी शिष्ट
खरच सांगते
नाही मी गर्विष्ठ
छंद लिखाणाचा
निवृत्त जीवनी
देतो विरंगुळा
मोद मनोमनी
रमते माझी मी
माझ्याच छंदात
मिळतो स्वानंद
दिवस भरात
आहेच मनाने
सदा स्वाभिमानी
मम जीवनात
सुखी समाधानी
