महती शिवबांची
महती शिवबांची


धन्य ती माता, धन्य ती जिजाऊ..
त्यांचे सदैव ऋणी आम्ही राहू...
घडवले थोर प्रतापी शिवबा त्यांनी...
स्वतंत्र मराठी साम्राज्याचा पाया रचला ज्यांनी..
स्वातंत्र्याचे रक्त सळसळते ज्यांच्या उराउरात..
अशा मावळ्यांची फौज हो शिवबांच्या दारात..
सुराज्याची स्थापना केली शिवबांनी..
नागरिकांना उत्तम जीवन प्रदान केले त्यांनी..
अष्टप्रधान मंडळची स्थापना करून दिले देशाला एक उत्तम शासन..
शिकवले सर्वांना देशहित असावे सर्वोपरी नसावे महत्त्वाचे आसन..
राज्याभिषेक झाला ज्या दिवशी शिवबांचा..
तो दिवस ठरला गुलामगिरीला दूर सारण्याच्या..
स्वातंत्र्याची लखलखली ज्वाळा..
दूर करण्यास अंधार काळा..
मनामनात निर्माण झाली स्वातंत्र्याची इच्छा..
पुन्हा एकदा शिवराज्य स्थापन व्हावे हीच सदिच्छा..