महिमा स्त्री शक्तीचा
महिमा स्त्री शक्तीचा
धवल कांतीचा
महिमा सरस्वतीचा
शांतीचा, धिराचा
प्रेमाचा, निर्मळ पावित्र्याचा
निर्मोही, त्यागाचा
तुझ्या माझ्या विश्वासाचा
आत्मभानाचा, आत्मतृप्तीचा
हृदयातील नितळ प्रेमाचा
भक्ती आणि शक्तीचा
महिमा स्त्रीशक्तीचा
