STORYMIRROR

Shivani Hanegaonkar

Abstract Inspirational Others

3  

Shivani Hanegaonkar

Abstract Inspirational Others

महिला

महिला

1 min
757

लेक होवूनी मी जन्मले

यात माझा काय गुन्हा

शरीराचाा भेद म्हणून

पुसू नका पाऊल खुणा॥१॥


मुलगी आहेेस म्हणत तुम्ही

बालपण चोरून नेल

हसत्या खेळत्या घरात मला

एकटेपण करून दिल॥२॥


कधी पावसात भिजत होते

स्वप्ननांना पंंख नवे शोधत होते

बहरत्या वयात जगत होते

तेव्हा आयुष्य उद्ध्वस्त होते॥३॥


प्रथा म्हणून घर सोडून द्यावे

सखी म्हणून तुझी होवून जावे

लोक लाजेसाठी सारे सोसावे

माझे अस्तित्व तरी राहू द्यावे॥४॥


अर्धांगिणी म्हणतोस खरा

पण अधिकार तुझाच सारा

आवरत जातेे संसाराचा पसारा

शोधत राहते प्रेमाचा सहारा॥५॥


माझ्या व्यथा कथा बनून राहिल्या

मन मारून मी त्या सोसल्या

मुलगी झाले, सखी झाले,

बायको झाले, आई झाले,

खंत एकच मनासारखे म्हणून

थोडे जगायचे राहिले ॥६॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract