महाराष्ट्राची संस्कृती
महाराष्ट्राची संस्कृती
काय सांगू गाथा या
महाराष्ट्राच्या संस्कृतीची...
माय मराठी हो पावन
माती या महाराष्ट्राची...
नाना धर्म परंपरा
भाषा मराठी अभिमानाची...
सण साजरे येथे रे
नाही कसर कशाची...
नाही घरी दाणा तरी
अतिथी देवो भव मानो..
काय काय करावे मग
फक्त हेची आम्ही जाणो...
नारी सन्मान येथे
राजा शिवाजी बोलला...
दुमदुमला सह्याद्री रं
इतिहास हा बोलला...
खरा तोचि एक धर्म
मानवता येथे जागवीला...
संत ज्ञानेश्वर, तुकाराम
एकनाथ उपदेश दिला...
जत्रा भरते हो गावी
उठे हौस उल्हास मनी...
एकात्मता सदभावना
जगे हो हर एक मनी...
काय हिंदू, काय मुस्लिम
नाही भेद कधी मानला...
हाच खरा महाराष्ट्र रे
आजवर मी पाहिला...
