महाराष्ट्राची संस्कृती
महाराष्ट्राची संस्कृती
महाराष्ट्र आहे सुंदर आकृती
आहे त्याची सुंदर संस्कृती ।।१।।
संताच्या भूमीचा वारसा
अभंग, ओव्या, वारीचा आरसा ।।२।।
भूपाळी, ओवी वासुदेवाचा घुमतो नाद
नसे कोणताही जातीय वाद ।। ३।।
जिजाऊंच्या ऐकल्या रामायण, महाभारताच्या कथा
शिवबालाच समजल्या रयतेच्या व्यथा ।। ४।।
महाराष्ट्राची अस्मिता राखली शिबवानी
बलिदान दिधले लाखो मावळ्यांनी ।।५।।
महाराष्ट्र संस्कृती जपण्या होवू व्रस्तस्थ
शब्द सुमनांत न होई महाराष्ट्र संस्कृती बंदिस्त ।। ६।।
