महाराष्ट्राची संस्कृती
महाराष्ट्राची संस्कृती
महान असे माझे राज्य
राज्य असे हेच महाराष्ट्र
किती वर्णू यांचे मी गुण
आहे ते मावळ्यांचे राष्ट्र
हिंदवी स्वराज्य स्थापले
थोर शिवाजी महाराजांनी
औरंगजेबालाही हादरवले
मिळून मूठभर मावळ्यांनी
किल्ले गड नि भव्य वास्तू
यांची काही मोजदाद नाही
बत्तीस जिल्ह्यांची ही पहा
निराळीच अशीही अपूर्वाई
माझ्या या महाराष्ट्रातील
नद्या झुळझुळ बारमाही
गावे खेडी शहरें सर्वांना
पाण्याची कमतरता नाही
कृष्णा वेण्णा नि गोदावरी
कोयना मूठा आणि मुळा
राबतोय बळीराजा माझा
फुललाय त्याचा हा मळा
ज्ञानोबा-तुकोबा एकनाथ
वारसा लाभला थोर संतांचा
बहिणाबाई जनाबाईने रोवला
झेंडा इथे वारकरी संप्रदायाचा
विठ्ठल खंडोबाज्ञनि सिद्धेश्वर
असती आमचे महाराष्ट्र दैवत
अंबाबाई आईभवानी देवतांची
पाठीशी आहेच अखंड सोबत
गवळणी लावण्या पोवाडे
महाराष्ट्राची हीच लोकधारा
कबड्डी क्रिकेट आणि कुस्ती
खेळून शीण घालवूया सारा
अडाणी स्त्रियादेखील आहेत
महाराष्ट्रातील सर्वगुणसंपन्न
वैभवशाली महाराष्ट्र हा माझा
परंपरेतून दाखवी स्त्रीदाक्षिण्य
अजिंठा वेरूळ कैलास लेणी
नागझिरा ताडोबा अभयारण्य
जायकवाडी उजनी धरणातील
पाण्याने बळीराजा झाला धन्य
