महाराष्ट्राची संस्कृती
महाराष्ट्राची संस्कृती
माऊली माझी महाराष्ट्र माऊली
विविधतेने नटली, सजली
युगेनयुगे हिची संस्कृती
गंगा भुमीवरी अवतरली
ताठ उभा तो गिरी सह्याद्री
शोभे तिरंगा वरी
संतांच्या या उपदेशाने
झाली पावन भूमी
शिवबांची तलवार फिरली
डोंगर-गडी-कपारी
लेकरा पाठीवरी घेऊनी
लढली झाशीची राणी
वसा साविञीचा घेऊनी
लेकी घेती नभी भरारी
भीम-ज्योती तव थोरांनी
महाराष्ट्री घडविली क्रांती
काय सांगू महाराष्ट्राची थोरवी
भूमी हि क्रांतीवीरांची
शूर गौरवी रणरागिणींची
भू यशस्वी उद्योजकांची
महाराष्ट्राची हिरवी सृष्टी
एकजुटीची,समानतेची
दिसे एकता सण-उत्सवांतुनी
नाना कला इथेची नांदती
अशी माझी महाराष्ट्र माऊली
जन्मती इथे ती धन्य जाहली.
