महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र माझा
संस्कृतीच्या लावण्याचा
असे शिरावर ताज
शोभून दिसे महाराष्ट्र माझा
शौर्याचा लेऊन साज
ज्ञानियांच्या राजाने
जिची महती वर्णिली
अशा मराठी भाषेने
महाराष्ट्र भूमी सजली
संताची भूमी ही
अभंगाने दुमदमली
कर्मठांच्या जगाला
माणुसकी शिकवली
झळकली तलवार शिवबाची
अन् झुकवला तख्त दिल्लीचा
गाजला इतिहास जगी
तो वीरांचा महाराष्ट्र माझा
साहित्याचा गुलमोहर अन्
वारसा दिव्य लोककलेचा
दऱ्याखोऱ्यांच्या सौंदर्याने
नटला महाराष्ट्र माझा
