महाराष्ट्र देशा
महाराष्ट्र देशा
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
महान माझे राष्ट्र असे
महाराष्ट्र त्याचे नाव असे
डोंगर दऱ्या कडे उंच दिसे
प्राचीन आमुची संस्कृती असे
संतांची भूमी माझा महाराष्ट्र
नद्यांचे तीर्थक्षेत्र महाराष्ट्र
इतिहासाचा साक्षीदार महाराष्ट्र
नरवीर शुरांचा महाराष्ट्र
सुजलाम सुफलाम भूमी आमुची
शौर्याची,त्यागाची कीर्ती महान
नररत्नांची खाण महाराष्ट्र
समतेचे आपण बांधू तोरण
संस्काराची शिकवण महाराष्ट्र
सुधारणेचा पाया महाराष्ट्र
स्त्रीशिक्षणाची प्रेरणा महाराष्ट्र
देशाचा गौरव महाराष्ट्र
मराठी असे आमुचा बाणा
मराठी असे आमुची मातृभाषा
शिवशंभूच्या पदस्पर्शाने पावन
भूमी,महान देशा,महाराष्ट्र देशा
