STORYMIRROR

Vasudha Naik

Inspirational

4  

Vasudha Naik

Inspirational

महामानव

महामानव

1 min
345

एक ज्ञानज्योत लावली डाॅ. आंबेडकरांनी

नमन त्या सूर्यासमान तेजाला

ज्योतीच्या दिव्य तेजाने त्यांच्याच

अज्ञानरूपी अंधार दूर केला नमन त्याला....


दिनरात अभ्यास कसून केला

समाजात कर्तृत्त्वाचा मान मिळवला

शिकण्याच्या जिद्दिला सलाम त्यांच्या

जातीभेद तोडूनी सत्याचा मार्ग दाखवला....


रमाबाईंच्या साथीनं समाज घडवला

अंधश्रद्धा,गुलामगिरीला कात्री लावली

भारतात एकजूट निर्माण केली

नवसूर्याची कीर्ति अजरामर राहिली....


अशा अजरामर तेजाने तळपला भीम 

माणूसकिचा धडा समाजाला शिकवला

"राज्यघटनेचा शिल्पकार"हा 

किताब बॅरिस्टर होवूनी मिळवला......


मूक समाजाचा नायक आपण

ज्ञानमयी प्रकाश दिला आंबेडकरांनी

नमन करुया सारे या महा मानवाला 

झळकतो आज भारत सारा दिव्यतेजांनी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational