STORYMIRROR

Pranjali Kalbende

Abstract Action

2  

Pranjali Kalbende

Abstract Action

महाडचा सत्याग्रह

महाडचा सत्याग्रह

1 min
87

महाडचा सत्याग्रह

चवदार तळ्याकाठी

साक्षीदार जलाशय

इतिहास देण्यासाठी.....१


मुक्तीसंग्रामाचा लढा

दिला बाबासाहेबांनी

केले प्राशन ते जल

घेत ओंजळ पाण्यानी.........२


किती पिढ्यांची मुक्तता

घोटभर प्राशनाने

विषमता दूर झाली

एका तळ्याच्या स्पर्शाने.........३


पाणी अस्पृश्यांना द्यावे

मुळ हेतू सत्याग्रही

संपो विटाळ कुनिती

चेतावणी हि आग्रही.......... ४


सबलीकरण दिन

भारतीय जनतेचा

महाडचा सत्याग्रह

अस्पृश्यांना मुक्ततेचा.........५


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract