STORYMIRROR

Rajashri Kamble

Children

4  

Rajashri Kamble

Children

मेजवानी

मेजवानी

1 min
253

चिवचिव करत चिमणी आली 

ब्रेकफास्ट ची वेळ झाली 

मागोमाग मिठु मिठु करत 

पोपट ही आला 

चिमणी मग भुर्र उडाली 

मिठु दादाने झुलत तारेवर 

ताव मारला नाश्त्यावर 

कावळे दादाच्या भुकेची 

 वेळ व्हायची अजुन

आता ग राहिल्या मैना 

बुलबुल आणि खारूताई 

सगळ्या येतात जोडी जोडीने

दाणे टिपतात आळीपाळीने 

शेवटी येतात मुंग्या आणि मुंगळे 

साफसफाई करतात सगळे 

त्यांचीही होते मेजवानी फक्कड 

खाऊन पिऊन होता पोटभर 

ऊडून जाती लांब दूरवर...........


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children