STORYMIRROR

Rajashri Kamble

Others

3  

Rajashri Kamble

Others

आली आली हो दिवाळी !

आली आली हो दिवाळी !

1 min
319

दीपावली घेऊन आली 

लक्ष दिव्यांची दीप माला 

जिवन सर्वांचे जाईल 

उजळून, ह्या दिवाळीला 

आली आली हो दिवाळी ||१||


येई लक्ष्मीच्या पावलाने 

सुख आनंद सोबतीने 

नसेल कशाची ही ददात

धन ही येईल हिच्या आगमनाने 

आली आली हो दिवाळी || २ ||


लाऊन उटणे सुगंधी 

मुले-बाळे, यजमानासी 

घालू अभ्यंग स्नान तयासी 

औक्षण करू प्रातःकाळी 

आली आली हो दिवाळी || ३ ||


करू मनोभावे पूजन 

श्री लक्ष्मी मातेचे आपण

दीप लाऊ हो या दारी

प्रकाशमान नगरी सारी 

आली आली हो दिवाळी || ४ ||


लाडू, बर्फी, करंज्या गोड 

चकली, शेव, चिवड्याचा 

पाडती फाडशा लहान-थोर 

सण हा आला खवय्यांचा 

आली आली हो दिवाळी || ५ ||


आतिषबाजी फटाक्यांची 

सुंदर दिसे अमावस्येला 

मुले होती मनी आनंदी 

पाहूनी त्या रोषनाईला 

आली आली हो दिवाळी || ६ ||


दीपावली हा सण मोठा 

सुख अन् आनंदाचा साठा 

देऊन भेट एकमेकांस 

प्रेम व स्नेहाची वाढऊ रास 

आली आली हो दिवाळी || ७ ||


Rate this content
Log in