या वळणावर
या वळणावर
आयुष्य सरून गेले भरभर
उडून गेले, सारे यौवन सरसर
कर्तव्याच्या या मगरमिठीत
विसरून गेले जगणे क्षणभर
जीवन मरणाच्या उंबरठ्यावर
वाट आडवी आली अवचित
विज कोसळली जणू मजवर
वाटेवरच्या या वळणावर
विरहातील दुःखद वाटेवर
भेटला मला एक वाटसरू
दिला मज त्याने, हात प्रेमाचा
सुचेना मला, मी काय करू?
अनाहूत तो आला अचानक
हात त्याचा मी कसा धरू?
मन माझे झुलत घेई हिंदोळे
मनास माझ्या कसे आवरू?
दिल्या घेतल्या ना आणा-भाका
संकटी ढाल होऊन, उभा ठाकला
दु:खावर सुखाची, फुंकर घालून
मजसाठी दिनरात झगडला
सोबत हवी आम्हास एकमेकांची
आयुष्यातील या सायंकाळी
काठी होऊ एकमेकांची
होईल संध्या सुकर, निराळी
