मन पाखरू
मन पाखरू
1 min
180
मन हरपले माझे
बालपणीच्या काळात
सख्या सवंगड्या संगे
रमे विविध खेळात....... || १ ||
वाटे होऊन लहान
फुलपाखरू धरावे
पानाफुलासंगे छान
हितगुज ही करावे........ || २ ||
मन होऊनी पतंग
ऊंच आकाशी उडते
कधी होऊन मयूर
मेघ बघता नाचते ...... || ३ ||
कधी होऊन सुगंध
फुलाफुलांत लपावे
मेघ होऊन मनस्वी
मनसोक्त बरसावे ..... || ४ ||
स्वप्नाच्या दुनियेत
मदमस्त हुंदडावे
हुंदडता या,दुनियेत
जरा जगून ही घ्यावे... || ५ ||
