STORYMIRROR

Rajashri Kamble

Others

3  

Rajashri Kamble

Others

अजूनी मन माझे ओले

अजूनी मन माझे ओले

1 min
171

गोड गुलाबी स्वप्नात होते रमले मी 

बाळाच्या इवल्या इवल्या पावलांनी 

स्वप्न होते माझे सुंदर सजले 

आघाताने क्षणात डोळे भरले आसवांनी ||१||


आली क्रूर नियती चोर पावलांनी 

घेतला घास तिने माझ्या स्वप्नांचा 

आक्रंदन करूनी आटला डोह 

डोळ्यातील माझ्या ओल्या आसवांचा ||२||


पडले जरी कोरडे नयन माझे 

तरी कोपर्‍यात एका, मनाच्या 

राहिला ओलावा जरासा दडूनी 

ठेवू झाकून कसा नजरेतून जनाच्या ||३||


मन माझे ओले कोपर्‍यात दडलेले 

मिळता प्रेम, मायेचा ओलावा जरा 

येई उसळून वर मन माझे शोधण्या 

आला कुठून हा प्रेमळ, मायेचा झरा ||४||


राहिले तरी मन माझे ओलेतेच 

तन मनाच्या आशाही राहिल्या बाकी 

आठवात हरवून मी सख्याच्या होईल 

माझ्या बाळासंगे आयुष्यात सुखी ||५||



Rate this content
Log in