STORYMIRROR

Rajashri Kamble

Others

2  

Rajashri Kamble

Others

पाऊसधारा

पाऊसधारा

1 min
8

निळ्या आकाशी दाटले,

मेघ काळे पावसाचे.

आभाळ भरून आले, 

मन जसे माणसाचे. 


नाचू लागला मनमोर,

थुईथुई,नाचे जसा मोर.

पावसाच्या चाहूलीने होई,

मन आनंद विभोर.


सरी बरसू लागल्या, 

हळुहळु, जोर धरला.

जसा जसा पावसाने, 

तसा दिस अंधारला. 


प्रगटली एकाएकी 

कुठुन ही दामिनी?

गेली चमकून जशी,

लखलखत्या आगीवानी. 


लागे म्हातारी दळाया, 

हरबरे आकाशात 

जाती घाबरून सारे,

बसती, दडून घरात. 


मनसोक्त बरसला, 

तृप्त झाली ही धरणी.

बीज बीज अंकुरले, 

देवा तुझीच करणी. 


नद्या नाले वाहतात, 

मग तुडूंब भरूनी. 

मिटे साऱ्यांचीच तृष्णा, 

जल ठेवू साठवूनी. 


સામગ્રીને રેટ આપો
લોગિન