STORYMIRROR

Rajashri Kamble

Others

3  

Rajashri Kamble

Others

अजून पाळण्यात मी

अजून पाळण्यात मी

1 min
181

विमानाच्या आवाजाने आभाळाकडे बघते 

मी अजूनही माझ्यातील बालपण जपते ||

मनी माऊला बघता मीही मनी माऊ होते 

म्याँव म्याँव करत, तिला धरायला भिते ||

वळवाच्या पावसात ही, मनसोक्त मी भिजते 

हाती पाऊस धरून, माझे बालपण जगते ||

फुलपाखरू बघून त्याच्या मागे मी पळते 

पकडायचे सोडून,त्याच्या रंगीबेरंगी, रंगात रमते ||

चांदोमामाला बघून, मनी विचार हा येतो 

जिथे जिथे मी जाईल, तिथे मागे मागे का येतो? ||


Rate this content
Log in