STORYMIRROR

Rajashri Kamble

Others

3  

Rajashri Kamble

Others

नाते शब्दांशी

नाते शब्दांशी

1 min
146

जुळले नाते 

शब्द- मनाचे 

प्रित अवतरली 

मिलन होता

ह्यांचे, गाली 

लाली ही फुलली || १ ||

भाव मनाचे 

माझ्या कसे या

शब्दांना कळले ?

बघून माझ्याकडे जणू

हे,हसू कां लागले ? || २ ||

सांगु नको हे

गुपित कुणाला 

त्यांना बजावले 

बाहेर पडण्या 

शब्द मनातील 

थोडे घुटमळले. || ३ ||

मग सांगू लागले 

मलाच माझ्या 

भाव मनातले

ऐकुन माझ्या 

भाव मनाचे

मीच लाजले || ४ ||

येता जाता

शब्द मनातील 

बघून मला हसती

कर गं मोकळे

भाव मनातील 

शब्द मला सांगती . || ५ ||


Rate this content
Log in