STORYMIRROR

Rajashri Kamble

Others

3  

Rajashri Kamble

Others

आठवांच्या सरी

आठवांच्या सरी

1 min
121

सागरात आनंदाच्या डूंबले मी किती जरी 

पाऊस आठवांचाच मजला ओला करी || धृ ||


आठवांच्या सरी बरसता मनाच्या अंगणी 

विसरते त्या सरीत मी दुनिया सारी 

कधी सुखाच्या कधी दु:खाच्या सरी 

भिजवून जातात चिंब चिंब मज अंतरी 

सागरात आनंदाच्या..............|| १ ||


भेटला होतास कधी मला तू नदी किनारी 

सारली होती बट केसांची मुखावरील माझी मागे 

वाराही मग छेडण्या मजला, धजला न पुढे 

मंद मंद स्मित करित तोही वाहू लागे 

सागरात आनंदाच्या............ || २ ||


केला होतास कधी तू अट्टाहास 

हात माझा धरून मिठीत घेण्याचा 

परि न मज भावला हा बाणा तुझा गडे !

थांब जरा,होऊ दे सोहळा एकमेका स्वीकारण्याचा 

सागरात आनंदाच्या..............|| ३ ||


दिसते मी आनंदात आज जरी 

तरी दु:खे कितीक मी लपवली आहे कुशीत 

आठव येता त्या दु:खद यातनांची 

सुख ही माझे विव्हळते माझ्या मिठीत 

सागरात आनंदाच्या डूंबले मी किती जरी 

पाऊस आठवांचाच मजला ओला करी 

पाऊस आठवांचाच मजला ओला करी.......|| ४ ||



Rate this content
Log in