STORYMIRROR

Rajashri Kamble

Others

3  

Rajashri Kamble

Others

शब्द मोती

शब्द मोती

1 min
278

अश्रू भरता डोळ्यात 

शब्दच येती धाऊन 

प्रेम ही किती शब्दांत 

अश्रूं जाती परतून || १ ||


हास्य फुलता ओठी 

शब्दांची होते दाटी

एकमेकां मारती मीठी

ओठातून शब्द ही न फुटी || २ ||


सुख दुःखाच्या समयी 

आसवांच्या संगतीने 

शब्द येती भर - भरूनी 

डोळेच बोलती मुक्याने || ३ ||


बघता शुन्यात कधी 

हलकेच डोकाऊन 

शब्द मनात पाही 

शब्दास सुचेना काही || ४ ||


शब्द माझे संगी-साथी 

शब्दच सोबती माझे 

शब्दावीन अधुरी मी 

विश्वच असे शब्द माझे || ५ ||


Rate this content
Log in