मेहनत
मेहनत
असामान्य यश मिळवण्यासाठी,मेहनतही लागते असामान्य,
मेहनतीला नाही पर्याय, मेहनत हेच यशाचे धान्य
यशाची किंमत तुम्हाला,अफाट कष्टाने चुकवावी लागते,
शॉर्टकटने जाणारी माणसं, दुप्पट वेगाने खाली कोसळते
गाठायच उद्दिष्ट तर,परिश्रमाशिवाय गत्यंतर नाही,
नेमक्या मेहनतीशिवाय, माणूस राहतो नुसता भारवाही
सर्वोत्तम घडायचं, घडवायचं तर, कष्ट झेलावेच लागतील,
सुंदर मूर्ती घडवण्यासाठी, घाव घालावेच लागतील
