STORYMIRROR

Chandan Pawar

Inspirational

4  

Chandan Pawar

Inspirational

Me Too मी-टू

Me Too मी-टू

1 min
446

नैतिक-अनैतिक समीक्षण

Me Too ने होतय छान;

शोषित महिलांच्या आरोपांनी

हरवलंय भल्याभल्यांचे देहभान.


महिलांच्या लैगिक शोषणाने

समाजमन झालेय प्रक्षुब्ध;

Me Too च्या विळख्याने

नाना व महानायकही स्तब्ध.


Me Too च्या वादळाने घेतली

अकबराची पहिली विकेट ;

आरोपातून होणारी गच्छंती

म्हणजे काही वर्षापूर्वीचे सिक्रेट.


राजकारण-क्रीडा-मनोरंजन

क्षेत्रात Me Too ची लागण;

"महिला सक्षमीकरण" ठरतेय

केवळ दिखाऊ स्लोगन.


Me Too जनसामान्यांच्या

जीवनात जेव्हा घुसेल;

तमाम आंबट शौकिनांची

वाचा तेव्हा बसेल.


Me Too ने देशभरात

वाढलाय सर्वत्र क्लेश;

पत्नीने पतीला Me Too

करणे राहिलेय शेष.


अभिव्यक्ती स्वातंत्र्याखाली

आरोपांची राळ फेकू नका;

आरोप सिद्ध झाल्याविना

कोणासही कमी लेखू नका.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational