STORYMIRROR

Sanjay Gurav

Inspirational

3  

Sanjay Gurav

Inspirational

मदत

मदत

1 min
413

अडलेल्यास करावी मदत

पाहू नये तेव्हा पद अन पत

स्वार्थाचा नको लवलेशही

मनापासून असावी ही आदत


मदत असते एक संधी सेवेची

मदतीला जोड असावी त्वरेची

जाण असावी मात्र भल्याबुऱ्याची

ज्योत अंतरात उजळो खऱ्याची


एकदा दिलात कुणा मदतीचा हात

चुकूनही करु नये मग विश्वासघात

मदतीला असतेच ईश्वराची साथ

कठीण संकटावरही करता येते मात


मदतीत नसावा कधीच मानपान

मदतीची मात्र ठेवावी सदाच जाण

करतात मदत जे विसरून देहभान

राहते नेहमीच उंचावलेली त्यांची मान


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational