मैत्रीण..
मैत्रीण..
सुंदर माझी मैत्रीण, सुंदर तिचे विचार भेटीमुळे तुझ्या, मिळतो मनाला माझ्या आधार॥१॥
दोन शब्दांनी जुळलो आपण, नाव ज्याचं "मैत्री" सुख दुःखात देशील तू साथ माझी आहे मला याची खात्री//२//
रक्ताच्या नात्या होऊनही मोठ आपलं नात, जगात या ज्याला नाही कुठलही मोजमाप//३//
हसलीस तू की येते मला हसू, फक्त कधी डोळ्यात
तुझ्या येऊ देऊ नकोस आसू // ४/-
एकमेकींना खूप देतो मनापासून आपण मान पण गप्पागोष्टीत रमल्यावर विसरतो वेळेचं भान॥५॥
अशीही मैत्रीण माझी आहे खूपच गोड, मैत्रीला आम्हच्या नाही कुठली तोड//६//
