मैत्री
मैत्री
कोणी छेडली ही तार,
उमटले सप्तसूर आसमंतात,
मिसळले सूर सप्तरंगात,
इंद्रधनुष्य अवतरले आकाशात,
सुरांना हवी स्वरांची साथ,
मैत्रीला हवी विश्वासाची साथ,
सुरांची लय,मैत्रीची ओढ,
घेते आकाशी उंच भरारी,
अनुभूती मिळाली विश्वासाची,
तेव्हा दृढता वाढली मैत्रीची...
